बीड़ ( प्रतिनिधी ) बीड़ शहरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी अग्रेसर असलेल्या शाहू माध्यमिक विद्यालय शाळेतील नवउपक्रमशील शिक्षक श्री दीपक पांडुरंग सरवदे यांची शिक्षण क्षेत्रातील भारतात होणार्या सर्वात मोठ्या कार्यशाळे साठी बीड़ जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे. ही कार्यशाळा गत आठ वर्षापासुन आशिया खंडातील सर्वात मोठी कार्यशाळा असून, शिक्षण क्षेत्रा मध्ये येणार्या भविष्यातील नवीन उपक्रम आणि उपयोजन यावर भारत सरकार तर्फे अटल लॅब, व डिडैक यांच्या संयुक्त विद्यमाने बंगळूर येथे 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
सर्वात जलद गतीने डिजिटल तंत्राने विकसित होणार्या शिक्षण क्षेत्रातील प्रथम गणले जाणारे हे भारतातील अग्रीम प्रशिक्षण आहे. वर्षातून फक्त एकदाच भारत सरकार ही कार्यशाळा, विविध संस्था मार्फत आयोजित करीत असते. या प्रशिक्षण असलेल्या कार्यशाळेसाठी देशभरातील निवडलेले शिक्षक तंत्रज्ञान विकसित केलेले नवनवीन डिजिटल संकल्पना अवगत करतात. त्यासाठी एनसीईआरटी द्वारा तसेच ब्रिटिश कौंसिल द्वारा 21 व्या शतका मधील संकल्पना शिकवून त्या आत्मसात करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ह्या प्रशिक्षणात नवीन उपक्रम म्हणुन स्टोरी टेलिंग च्या माध्यामातून विद्यार्थ्यानी आपले ज्ञान कसे वाढवता येऊन, त्याचा त्यांच्या अभ्यासात कसा उपयोग करून घ्यावा याचे ही प्रशिक्षण कॅनव्हा सॉफ्टवेअर कंपनी मार्फत देण्यात येणार आहे. दीपक सरवदे यांनी या अगोदर ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषय वरील कार्यशाळा उत्कृष्ट पणे पूर्ण केली होती त्यासाठी अटल इन्नोवेशन मिशन (AIM) तर्फे त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले होते. विविध प्रशिक्षण घेऊन त्यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन करून ज्ञानदान केले आहे.
त्यांच्या या निवडीचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा. रावसाहेब आगळे, साहेब, सचिव मा. अजय पाटील साहेब, तसेच ईतर संस्था पदाधिकारी, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक श्री, सुधाकर शिंदे, तसेच प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक भोसले सर, तसेच साहित्यिक तथा जेष्ठ रंगकर्मी डॉ. सतिश साळुंके सर यांनी केले.