उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नतो अभियाना अंतर्गत आपल्या तालुक्यातील महिला समूह उत्कृष्ट उत्पादने, अन्न प्रक्रिया उत्पादने तयार करीत आहे किंवा समूह हे शेंद्रीय पद्धतीने फळ/ भाजीपाला यांचे उत्पादन करीत आहेत. या स्वयं सहाय्यता समूहाच्या उत्पन्न वाढीकरिता व त्याच्या उत्पादनाच्या विक्रीकरिता योग्य बाजारपेठ मिळून देणे आवश्यक आहे. व या करिता मराठवाडा
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
मुक्तीसंग्राम व आझादी का अमृत मोहत्सव याचे औचित्य साधून पुणे येथील SGS मॉल येथे दिनांक २३.०९.२०२२ ते २५.०९.२०२२ याकालवधी मध्ये उमेद अभियान बीड अंतर्गत बचत गटातील महिलांनी उत्पादीत वस्तूचे हस्तकला बंजारा आर्ट विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.
औरंगाबाद विभागातील प्रत्येक जिल्हाकरिता ०१ स्टॉल देण्यात आलेले आहे. बीड जिल्यातून परळी तालुक्यातील वसंत नगर तांडा येथील बंजारा वर्क, बंजारा दागिनेयाचे उत्पादन करून विक्री करणाऱ्या गटांना या विक्री प्रदर्शन मध्ये सहभाग करणेबाबत संधी देण्यात आलेली आहे.
सदरील प्रदर्शन हे आझादी का अमृत मोहत्सव व हैद्राबाद मुक्तीसंग्राम (तथा मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन) "अमृतमहोत्सवी वर्ष 2022-23" निमित्त औरंगाबाद विभाग अंतर्गत असलेले सर्व जिल्हे सहभाग नोंदवित आहेत. सदरील विक्री आणि प्रदर्शनास जास्तीत जास्त पुणेकरांनी लाभ घ्यावा तसेच बीड जिल्ह्यातील नागरिक जे पुणे येथे स्थायिक आहेत यांनी घ्यावा व या विक्री व प्रदर्शनाची माहिती लोकांपर्यंत पोहोच करावी असे आवाहन मा अजित पवार मा मुख्य कार्यकारी अधिकारी जि प बीड , मा. प्रकल्प संचालक वासुदेव सोळुंके, श्रीमती त्रिवेणी भोंदे जिल्हा अभियान व्यवस्थापक यांनी केले आहे अशी माहिती शकील शेख जिल्हा व्यवस्थापक उमेद अभियान बीड यांनी दिली आहे.