शेवताच्या ग्रामस्थांचे जलआंदोलन फुलंब्री तालुक्यातील शेवता खुर्द व शेवता बुद्रुक या दोन्ही गावांमधून गिरजा नदी वाहत असल्याने विद्यार्थी , शेतकरी व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे . दळणवळण ठप्प असल्याने मोठे नुकसान होत आहे . अनेक निवेदने दिली मात्र याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने दोन्ही गावांच्या नागरिकांनी मंगळवारी जल आंदोलन केले सुमारे अडीच तास चाललेल्या आंदोलनाकडे कोणीही फिरकले नाही शेवटी मंडळ अधिकारी सुरेश मिसाळ यांनी निवेदन स्वीकारले अशा परिस्थितीत विद्यार्थी व शेतकरी कसरत करून जीव मुठीत धरून शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतात मात्र यातून पाण्याची पातळी वर झाली तर हा प्रवास जीवावर बेतू शकतो पुलासाठी किती वेळेस मागणी करावी किती निवेदन द्यावे किती आंदोलन करावे मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही . ७५ वर्षांनंतरही संघर्ष सुरूच विकास झाला , विकास होतो , गाव तेथे रस्ता , हे ऐकून गावकरी कंटाळले आहेत खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असे लोकप्रतिनिधी यांनी कधीही लक्ष दिले नाही आतापर्यंत या पुढाऱ्यांनी फक्त या लोकांना आश्वासन देऊन हुलकावणी दिली यामुळे गावकरी त्रस्त झाले भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाले यावर्षी ७५ वर्षाचा मोठा गवगवा झाला . याच भागातील लोक रजाकारी विरोधात लढले मात्र आजही या लोकांचा तसाच प्रवास चालू आहे , यामुळे या लोकांनी जल आंदोलन केले यात विद्यार्थी शेतकरी यांचा समावेश होता . आंदोलनात सरपंच जनाबाई काळे , साईनाथ बेडके , संदीप बेडके , भीमराव बेडके , दत्तु तुपे यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . वडोदबाजार येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता