कडेठाण येथील श्री महालक्ष्मीच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
पाचोड(विजय चिडे) पैठण तालुक्यातील कडेठाण येथील श्री क्षेत्र कोल्हापूर निवासनी श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी मंदिर संस्थान व गावकर्यांच्या वतीने करण्यात आली आहे . येणाऱ्या २६ सप्टेंबरपासून नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा नवरात्र उत्सव निर्बंधमुक्त हाेत आहे. सुलभ व सुरक्षित दर्शन होण्यासाठी मंदिर देवस्थानच्यावतीने मंदिराच्या परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे कडेठाण येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील एकमेव उपपीठ आहे.नवरात्र उत्सवानिमित्त भाविक भक्त देवीचे दर्शन घेण्यासाठी राज्यातून व राज्याबाहेरून येतात यावर्षी जास्त गर्दी होणार असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे व मंदिरात घटी बसणाऱ्या भाविक भक्तांसाठी लागणार्या सर्व सुविधा ची व्यवस्था करण्यात आली आहे. पाचोड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष चव्हाण व आंबेकर हे विशेष पोलीस बंदोबस्त ठेवणार आहे. तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर संस्थान व समस्त गावकरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे .