मालेगाव दिनांक 21 सप्टेंबर 2022
वाशिम जिल्हा.
मालेगाव तालुका ,मधील "डव्हा गाव" या गावची एक वृद्ध महिला सोमवार दिनांक 19 रोजी महिला बचत गटाचे 23 हजार रुपये घेऊन स्टेट बँकेतून पैसे बाजार पिशवीत ठेवले होते. चोरट्यांनी पाळत ठेवून पार्वताबाई शिंदे वय वर्ष 60 ही महिला आठवडी बाजारामध्ये बाजार करण्यासाठी गेली असता, दुकानासमोर थांबल्या व भाजीपाल्या घेत असताना गर्दीचा फायदा घेत ,अज्ञात चोरट्यांनी त्या पिशवीवर दिवसाढवळ्या गर्दीमध्ये चिरा मारून रोकड लंपास केली व तेथून पळ काढला. वृद्ध महिलेच्या लक्षात आले असता नातेवाईकांच्या मदतीने मालेगाव पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली असता ,पुढील तपास मालेगावचे ठाणेदार आदरणीय किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत.