कन्नड: विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित सावरगांव  पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूकीत सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून दोन्ही कढील पँनलने प्रचाराचा रंग भरला होता. यात परिवर्तन शेतकरी विकास पँनलने प्रचारात पहिल्या दिवसापासूनच जोरदार मुसंडी घेतली होती. मंगळवार (ता.२०) सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव येथील मतदान केंद्रावर शेतकरी सभासद यांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ४ वाजता झालेल्या मतमोजणीमध्ये परिवर्तन शेतकरी विकास पँनलच्या १३ पैकी ९ जागांवर आपला भगवा फडकावत विविध कार्यकारी सेवा सोसायटी ताब्यात घेतली.निवडणूक निर्णय अधिकारी तथा, सहकार अधिकारी श्रेणी २, सलग्न सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता.कन्नडचे .सुनिल कासतोडे यांनी निवडणूक निकाल जाहीर करताच, सोसायटी ताब्यात येताच परिवर्तन शेतकरी विकास पँनलच्या ९ संचालक मंडळ यांनी एकच मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला. विजयी सोसायटी संचालक उमेदवार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते गावांतील मारोती मंदिर अशी भव्य विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला, भव्य अश्या निघालेल्या मिरवणुकीत गुलालाची उधळण करण्यात आली. तसेच नवनिर्वाचित सोसायटी संचालक यांनी आदर्श वसाहत सातकुंड येथे जाऊन तेथील देखील सभासद शेतकऱ्यांचे आभार मानले. परिवर्तन शेतकरी विकास पँनलचे नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे निकम रावसाहेब गणपत, जंगले रामराव भावराव, निकम दिनकर सोनजी, पवार बाबुराव जयराम,सोनवणे कडुबाई नामदेव, निकम मंगलाबाई राजु, निकम सिंधुबाई पोपटराव, राठोड सतुबाई विनायक, पवार हरचंद मोहन यांची संचालक म्हणून निवड झाली.