दिवशी बचाव पथकाने शोधकार्य राबविले, मात्र त्यानंतरही त्याचा थांगपत्ता लागला नाही.

पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील घटना

 पैठण/

पाटेगावजवळील गोदावरी नदीच्या पात्रावरील पुलावरुन एका युवकाने पाण्यात उडी मारली. शनिवारी सायंकाळी पाटेगाव येथील प्रविण भगवान पवार (३५) या युवकाने पाटेगाव पुलावरुन गोदापात्रात उडी मारली असल्याचे काही नागरिकांनी पाहिल्यानंतर सरपंच गोकुळ रावस यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पो.नि. किशोर पवार यांनी तत्काळपथकासह घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरु केले.

 सध्या जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे. त्यामुळे रात्रीच्याशोध घेण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका बचाव पथक व पैठण नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे जवान पात्रात बोटीने शर्तीचे प्रयत्न करीत आहे. घटनास्थळी पैठणचे तहसीलदार दत्तात्रय निलावाड, पो. नि. किशोर पवार यांनी भेट देऊन पथकाला सूचना केल्या.

अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. रविवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. आपेगाव उच्च बंधाऱ्यापर्यंत दोन बोटीद्वारे बचाव पथकाने दिवसभर शोध घेतला मात्र रात्री उशिरापर्यंत बचाव पथकाला त्याचा दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरू होते.