हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक केंद्रा बुद्रुक चया तलावामध्ये काळे झेंडे दाखवून जलसमाधी आंदोलन.

 अनेक शेतकरी तलावात जाऊन शासनाचा केला निषेध घटनास्थळी तहसीलदार जीवक कुमार कांबळे यांची भेट.पोलिस प्रशासनाचा कडक बंदोबस्त.

हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळे ही अतिवृष्टी अनुदान यादीतून वगळण्यात आली आहेत अतिशय अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले परंतु शासनाने सेनगाव तालुक्यातील चार मंडळ अनुदान यादीतून वगळण्यात आले आहेत . गोरेगाव आजेगाव पुसेगाव बाभूळगाव अशी चार मंडळ आहेत. सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान यादीत समावेश करण्यात आला पाहिजे सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात आले पाहिजे यासाठी दिनांक 15 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन वंचित बहुजन आघाडी चे माजी जिल्हा अध्यक्ष वसिम देशमुख यांनी दिले होते अनुषंगाने 20. सप्टेंबर रोजी सकाळी विविध मागण्यासाठी 

  शेतकऱ्यांनी केंद्रा बुद्रुक येथील तलावामध्ये अर्ध्या मध्ये जाऊन जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.

 या जलसमाधी आंदोलनांमध्ये शेकडो शेतकरी सामील झाले आहेत.यावेळी वशिम देशमुख व गजानन प्रकाश कावरखे यांच्या पुढाकारातून हे जलसमाधी आंदोलन सुरू असल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले .

यावेळी या आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी गोरेगाव पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक बाबुराव जाधव, सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठेंगे , यांच्या सह 

पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 या जलसमाधी आंदोलनाला सेनगाव चे तहसीलदार जिवक कुमार कुमार कांबळे यांनी भेट दिली यासंदर्भात त्यांनी निवेदन स्वीकारले .

परंतु आंदोलन कर्ते आपल्या मागण्यावर ठाम असल्याचे समजते जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण जलसमाधी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले या जलसमाधी आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.