कायमस्वरूपी आरोग्यसेवकाची नियुक्ती करा शिवसंग्रामची मागणी
शिरूर (प्रतिनिधी) आज.दि. 20.सप्टेंबर २०२२ रोजी मंगळवार शिवसंग्राम हिवरसिंगा शाखाअध्यक्ष श्री.रामेश्वर पांडूळे यांच्या च्या वतीने मा.वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र खलापूरी यांच्या कार्यालयात डॉ.गव्हाणे मॅडमयांच्या कडे तक्रार निवेदन देण्यात आले.यावेळी श्री.माऊली शिंदे (शिवसंग्राम ता.अ.शिरुर) श्री.शिवराम राऊत (ता.अ.ओबीसी शिरूर).श्री.ज्ञानेश्वर परजणे (ता.कोषाध्यक्ष शिवसंग्राम),श्री.दत्ता डोके,चि.आतुल शिंदे यांची उपस्थिती होती.सद्यस्थितीत मौ.हिवरसिंगा ता.शिरूर का.या गावात डेंग्यू या साथरोगाचे रूग्ण मागील काहिच दिवसापासून आढळून येत आहेत.अनेक गावकरी डेंग्यू लक्षणं आढळून येत आहेत.खाजगी दवाखान्यात,राजूरी,बीड, येथे महागडा उपचार घेण्याची वेळ आली आहे. आरोग्यविभागाणे योग्य ती खबरदारी घ्यावी, जणजागृती मोहिम राबवावी त्यासाठी शिवसंग्राम व गावकरी सर्व सहकार्य करतील. दि.२४ जूलै पासुन ते ०२ सप्टेंबर पर्यंत उपकेंद्र ला आरोग्यसेवक नसल्याने डेंग्यू व इतर साथरोग जाणीवजागृती झाली नाही.नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत साथररोग प्रतिबंध प्रयत्न हि झाले नाहीत.मूळ पदावरील हिवरसिंगा उपकेंद्र चे आरोग्यसेवक श्री.भरत नागगोजे हे २४ जूलै पासुन प्रतिनियुक्तीवर.जि.प.पाणीपुरवठा विभागाच्या गुणवत्ता निरिक्षक पदावर काम करत असल्याने या ठिकाणी तीन हजार लोकसंख्येच्या गावांसाठी आरोग्यसेवक नसणे हि खेदाची बाब आहे.पावसाळ्याचे दिवस व अपुरे कर्मचारी या मुळे अशा साथरोगाची जागृती करण्यात येत नाही.त्या मुळे हिवरसिंगातील डेंग्यू चां प्रसार झपाट्याने वाढत आहे.प्रतिनियुक्ती मिळवून गाव वा-यावर सोडणे व या पदावर कायमस्वरूपी आरोग्यसेवकाची नियुक्ती न करणे यासाठी शिवसंग्राम शिरूर घ्या माध्यमातून माध्यमातून मा.तालोका आरोग्य अधिकारी शिरूर व मा.मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब.जि.प.बीड यांना हिवरसिंगा उपकेंद्र हिवरसिंगाला कायमस्वरूपी आरोग्यसेवक उपलब्ध करूण द्यावा हि विनंती करण्यात येणार आहे.