१० दिवसांत अवैध नळांची यादी द्या औरंगाबाद: अधिकृत आणि अनधिकृत नळांची यादी येत्या दहा दिवसांत सादर करा , असे आदेश मनपा प्रशासक डॉ . अभिजित चौधरी यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना दिले . या यादीच्या आधारेच नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत  नागरिकांना नळ जोडण्या दिल्या जाणार आहेत . यादीच्या आधारेच हे नळ दिले जातील असे संकेत त्यांनी दिले . त्यामुळे अनधिकृत नळ असलेल्यांना नवीन योजनेचे नळ कनेक्शन मिळणे कठीण होणार आहे . ज्या भागात जलवाहिनी टाकूनही पाणी येत नाही किंवा दूषित पाणीपुरवठा होतो अशा भागात प्राधान्याने नवीन जलवाहिनी टाकण्याचे आदेश त्यांनी दिले . नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत सध्या तीस जलकुंभांचे बांधकाम सुरू आहे . त्यापैकी अकरा कामे प्राधान्याने करा . मार्चपर्यंत ११ जलकुंभांचे काम पूर्ण झाले पाहिजे , असे आदेश डॉ . चौधरी यांनी दिले . शहरातील पाणीपुरवठा आणि पाणी योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी डॉ . चौधरी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली . नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सर्वच मालमत्ताधारकांना नवीन नळ कनेक्शन दिले जाणार आहेत