दि. १९ पालम (परभणी) : अंतेश्वर येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यामध्ये पुर्णा व पालम तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी बुडीत क्षेत्राखाली गेल्या आहेत पण या शेतकऱ्यांना अद्यापही जमीनीचा मोबदला मिळाला नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे या अनुशंघाने अंतेश्वर बंधारा संघर्ष समितीच्या वतीने मोबदला मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
पालम तालुक्यातील राहटी, गुंज, दुटका, भोगाव, पिंपळगाव (मु ), बरबडी सांगवी इत्यादी
गावातील शेतकऱ्यांच्या जमीनी बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्राखाली गेल्या आहेत पण या जमिनीची मोजणी झाली नाही प्रशासनाकडून मोजणी दिरंगाईमुळे शेतकरी मोबदल्यापासून वंचित असल्या कारणाने शेतकऱ्यांची अर्थिक परीस्थिती संपूर्णपणे कोलमडली आहे तरी संबंधित प्रशासनाने
अंतेश्वर बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रातील जमीनीची प्रशासनाकडून मोजनी करुन तात्काळ मोबदला द्यावा अन्यथा अंदोलन करण्यात येईल अशा अशायाचे निवेदन दि. १९ सप्टेंबर रोजी अंतेश्वर बंधारा संघर्ष समितीच्या वतीने उपअभियंता भुमी अभिलेख यांना देण्यात आले
आहे.
सदरील निवेदनावर
अंतेश्वर बंधारास संघर्ष समितीचे अध्यक्ष बळीरामजी कदम, भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजीराव दिवटे, उपाध्यक्ष लिंबाजी अण्णा टोले, कुशबराव चव्हाण, नागेश सोनटक्के सरपंच पिंपळगाव, ओंकार ठाकूर उपस्थित होते.
मारुती ठाकूर, माणिक ठाकूर, मोतीराम पौळ गोविंद दिगंबर कराळे, सरपंच संतोष कराळे, विनायक गायकवाड, मारुती नाईकवाडे, छढोजी ठाकूर, प्रल्हादराव गाणार, चव्हाण दत्ता . ठाकूर इत्यादी च्या सह्या आहेत. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने