सोलापूर-प्रहार जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना डुक्कर भेट देणार होते. पण सोलापूर शहर पोलिसांनी डुक्कर भेट आंदोलन करण्यापूर्वी जमीर शेख,अजित कुलकर्णी व खालिद मणियार यांना अटक केले आहे.याबाबत माहिती देताना प्रहारचे शहर संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी नाराजी व्यक्त केली.सोलापूर महानगरपालिका आयुक्त शहरातील समस्या सोडवत नाहीत.आणि त्यांविरोधात पोलीस आंदोलन करू देत नाहीत.अशी खंत त्यांनीबोलून दाखवली.
सोलापूर शहरात विविध समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत महानगरपालिका आयुक्त हे गाफील आहेत.त्यामुळे प्रहारचे अजित कुलकर्णी यांनी आपली भूमीका मांडत माहिती दिली होती,की,पालिका आयुक्त पी शिवशंकर यांना सप्रेम भेट म्हणून डुक्कर भेट देणार आहोत.या पद्धतीनं आंदोलन करून पालिका आयुक्तांना जाग आणणार असल्याची माहिती दिली होती.
प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी गेल्या दोन दिवसांपासून डुक्करच्या शोधात होते.डुक्कर सापडले तरी ठेवणार कुठे असा प्रश्न पडला होता.पण ऐनवेळी एमआयडीसी पोलिसांनी जमीर शेख याना त्यांच्या राहत्या घरातून सोमवारी सकाळी 19 सप्टेंबर रोजी अटक केले.तर अजित कुलकर्णी यांना विजापूर नाका पोलिसांनी अटक करून डुक्कर भेट आंदोलन फेल केले.