मानवत : ता.19- परभणी जिल्ह्याचा दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट करा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मानवत तालुका संभाजी ब्रिगेड च्या वतीने सोमवार १९ सप्टेंबर रोजी शहरातील महाराणा प्रताप चौकात दुपारी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 या रस्ता रोको आंदोलनाला भाजपा वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला. या रास्ता रोको मुळे एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

परभणी जिल्ह्यातील पीक पेरणी साधारणतः १० जून पर्यंत झाली होती,परंतु सुरुवातीलाच पाऊस संततधार पडत राहिल्यामुळे पिकाची वाढ खुंटली. ऑगस्टमध्ये सलग ३० दिवस पावसाचा खंड पडला असल्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. असे या आंदोलनकर्त्यांनी यावेळी म्हटले. शासनाने जिल्ह्याचा दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट करून मानवत तालुक्यातील सर्व मंडळाचा पिक विम्याची अग्रीम रक्कम देण्यात यावी त्याचबरोबर खरिपाचा पिक विमा सरसकट मंजूर करावा अशी मागणी केली.

यावेळी शेतकरी संघटनेची रामभाऊ शिंदे, कम्युनिस्ट पक्षाचे काँ.लिंबाजी कचरे पाटील, बाजार समितीचे संचालक तथा मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष माधव नाणेकर, बाबासाहेब आवचार, अँड.सुनिल जाधव,स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे हनुमान मसलकर, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गोविंद घांडगे, किसान युवा क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव काळे यांनी उपस्थित आंदोलकांना मार्गदर्शन केले .

या रस्ता रोको आंदोलनात बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, संतोष लाडाने, दत्तराव शिंदे, कृष्णा शिंदे, संतोष आंबेगावकर, अँड. संतोष लाडाने, आकाश चोखट, सुरज काकडे, हनुमान मस्के,अमोल कदम, नामदेव होगे, रामभाऊ मस्के, अरुणराव देशमुख, संजय टाक, मोहन महिपाल, माऊली चांगभले, सुरेश होगे, दत्ता राऊत, माधव शिंदे, माऊली जाधव, आसाराम काळे, भगवान शिंदे, श्रीकांत देशमुख, राजेभाऊ होगे, विठ्ठल काळे, बळीराम रासवे, संजय देशमुख, माऊली शिंदे, अरुण शिंदे, प्रताप पिंपळे, शुभम काळे, गणेश घांडगे,गोपाळ पिंपळे, सुदाम मस्के, गजानन होगे, बालाजी टाक, रामप्रसाद काळे, रामराव साठे, सोपान सुरवसे, आसाराम काकडे, भगवान होगे,हनुमान होगे यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी रस्ता रोको आंदोलनात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पो.नि.प्रकाश राठोड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला तर या आंदोलकांचे नायब तहसीलदार नकुल वाघूंडे यांनी घटनास्थळी येऊन विविध मागण्याचे निवेदन स्विकारले