आज जवाहर विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री.बळीराम वटाणे सर, संस्थेचे संचालक श्री.किशनराव वटाणे सर, जेष्ठ शिक्षक श्री.एस.एस.इंगळे सर मंचावर उपस्थित होते.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात रांगोळी सजावट हे मुख्य आकर्षण ठरले.यात स्काऊट चं पथक, विविध राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषा, JVJ SPORTS ACADEMY चे खेळाडू सहभागी होते. तर याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध गीत सादर केले. याप्रसंगी निसर्ग मित्र मंडळ व हरित सेनेतर्फे जवळपास 200 विद्यार्थ्यांना विविध झाडे लावण्यासाठी वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयात विविध ऐतिहासिक विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात जवळपास 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच जेष्ठ शिक्षक श्री.एस.एस.इंगळे सर यांनी मनोगत व्यक्त करत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या इतिहास मांडला. यानंतर अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत म्हणजे आपल्या गावापासून ते देशपातळीचा इतिहास अभ्यासता येईल असे प्रतिपादन प्राचार्य श्री.बळीराम वटाणे सरांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री.कल्याण भोसले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.पी आर.चव्हाण सर यांनी मांडले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.