औरंगाबाद: १९ स.(दीपक परेराव) शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी सोमवारी पुंडलिकनगर येथील ज्येष्ठ शिवसैनिक स्व.पुंडलिक राऊत यांच्या स्मारकाचे दर्शन घेत अभिवादन केले. एका सामान्य शिवसैनिकाच्या नावाने पुंडलिकनगर ही वसाहत असून हिंदु रक्षणासाठी बलिदान दिलेल्या शिवसैनिकाचे जिल्ह्यात एकमेव स्मारक असल्याचे विधानसभा संघटक राजू वैद्य, युवा सेना उपसचिव ऋषी खैरे, युवा सेना जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे यांनी सरदेसाई यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी सोमवारच्या दिवसभराच्या बैठका, सभा, भेटी-गाठीतून वेळ काढीत स्मारकाला भेट देण्याचे ठरविले. सायंकाळी ४.३० वा. त्यांनी पुंडलिकनगर येथील ज्ये.शिवसैनिक स्व. राऊत यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले.
यावेळी माजी नगरसेविका मीना गायके, माजी नगरसेवक, मनोज गांगवे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, उपशहरप्रमुख संतोष खेंडके, दिग्विजय शेरखाने, सागर खरगे, अभिजीत थाेरात, उपशाखाप्रमुख भरत ढवळे, विभागप्रमुख बापू कवळे, अल्पसंख्यांक आघाडी पूर्व संघटक अखिल शेख ,दीपक परेराव,सिध्दार्थ वडमारे, विशाल गायके, स्वप्नील डिडोरे, जालींदर शिरसाट, राज नीळ, राजू चव्हाण, गणेश जैस्वाल, सागर वाघचौरे, बालाजी राऊत,विक्रांत पवार, मनोज बोरा,अमोल देशमुख, किशोर जाधव, यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
 
  
  
  
  