कर्जत विधानसभा मतदारसंघातील जनतेने आणि शिवसैनिकांनी शिवसेना पक्षाचा आणि धनुष्यबाण चिन्हावर आमदार निवडून आला आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या नावावर निवडून यायचं आणि नंतर गद्दारी करायची हे पक्षासाठी नवीन नाही. परंतु अशा गद्दार लोकांना जनताच घडा शिकवते, असा विश्‍वास शिवसेनेचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे संघटक भरत भगत यांनी व्यक्त केला. नेरळ येथे जिल्हा परिषद गटाचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी गद्दार पदाधिकारी यांची पक्षाने तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी या मेळाव्यात केली.

बापूराव धारप सभागृहात शिवसेनेच्या नेरळ जिल्हा परिषद गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उत्तम कोळंबे, सुनील पाटील, बाबू घारे, सुदाम पवाळी, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, सावळाराम जाधव, प्रथमेश मोरे, सुरेश गोमारे, दशरथ भगत, देशमुख, निवृत्ती झोमटे, सुधाकर देसाई, विश्‍वजीत नाथ, सुमन लोंगले, अ‍ॅड. संपत हडप, प्रमोद सुर्वे, रोहिदास मोरे, खोपोली शहर प्रमुख तसेच पदाधिकारी उपस्थित होते.