वसमत कुरुंदा मार्गे पार्डी खु बस फेरी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचे वसमत आगार प्रमुखांना निवेदन..!

वसमत कुरुंदा मार्गे पार्डी खुर्द पर्यंत लॉक डाउन अगोदर चालू असणारी बस फेरी पुन्हा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी वसमत बसस्थानक आगार प्रमुखांना संपूर्ण विद्यार्थी मित्रांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी वसमत, कुरुंदा,कोठारी,पार्डी खु.,कौठा,वाडी,दाभाडी,नेहरूनगर आदी. भागातील तरुण विद्यार्थी उपस्थित होते,निवेदन दिल्यानंतर आगार प्रमुखांसोबत झालेल्या संभाषणात येत्या दहा दिवसात पार्डी खुर्द पर्यंतची बस फेरी आणि कुरुंदा भागात विशेष बस फेरी वाढवण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

येत्या दहा दिवसांत बस फेरी चालू न झाल्यास आम्ही संपूर्ण विद्यार्थी मिळून मोठे तीव्र आंदोलन उभे करू असा इशारा जय विजय लोखंडे यांच्या वतीने निवेदनात देण्यात आला आहे.