जयपुर जिल्हा परिषद शाळेला मिळाला इयत्ता 8 वीचा वर्ग, ग्रामपंचायत, गावकऱ्यांच्या बैठे आंदोलनाला यश
सेनगाव – तालुक्यातील जयपूर येथील जिल्हा परिषद शाळेचे इयत्ता आठवी वर्गाला मान्यता देण्यात यावी, या मागणीसाठी सरपंच संदीप पायघन यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बैठे आंदोलन व गेट बंद आंदोलन केले होते. हे आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शिक्षणाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची ही न्याय मागणी मंजूर करून वर्ग वाढवून देण्याबाबत मुख्याध्यापकांना आदेशित केले आहे.
सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे विद्यार्थ्यांच्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या शाळेत अपुरे वर्ग होते. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव इयत्ता 7 वी नंतर बाहेरगावी अथवा शहराच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते. बहुतांश पालकांना सदरील खर्चिक बाब परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना आपले शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागत होते.
सदरील बाबत लक्षात घेऊन ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष सरपंच संदीप पायघन आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जयपूर येथे इयत्ता 8 वी वर्ग देण्याबाबत मागील काही दिवसांपासून मागणी केली होती. तसेच सदरील प्रश्न मार्गी लावण्याबाबत सरपंच संदीप पायघन यांनी कंबर कसली होती.
या मागणीसाठी 19 ते 20 सप्टेंबर दरम्यान हिंगोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बैठे आंदोलन व गेट बंद आंदोलन जयपुर सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शिक्षण अधिकारी यांनी जयपूर येथील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने जयपुर ग्रामस्थांची ही न्याय मागणी