रांजणगाव खुरी येथे दि.१९ सप्टेंबर रोजी जनावरांना लम्पी आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक स्वरूपात लसीकरण करण्यात आले. लम्पी या आजाराने पाच कि.मी. अंतरावर असलेल्या शेकटा गावामध्ये तीन बाधीत जनावरे मिळाल्याने व आजाराची भयानकता लक्षात घेऊन रांजणगाव खुरी येथील पत्रकार तथा मानवाधिकार सहायता संघाचे संभाजीनगर जिल्हा सचिव विकास ढगे यांनी ग्रामसेविका राठोड मॅडम यांना गावातील जनावरांना लसीकरण घेण्याची मागणी केली असता ग्रामसेविका राठोड यांनी तात्काळ पशुधन सहाय्यक विकास अधिकारी डॉ.थोरात यांना ग्रामपंचायत कडून तत्काळ जनावरांना लसीकरण घेण्यासंदर्भात पत्र पाठवले व जवळ असलेल्या शेकटा गावामध्ये तीन लम्पी आजाराने बाधीत जनावरे मिळाल्यामुळे डाॕ. थोरात पशुधन सहायक विकास अधिकारी व टिम यांनी गावांमध्ये जनावरांना मोफत लसीकरण व तपासणी शिबीर राबविले. यामध्ये रांजणगाव खुरी व परिसरातील जवळ ७८० जनावरांना लसीकरण देण्यात आले हे लसीकरण डाॕ. डि.व्ही. थोरात पशुधन सहायक विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले या शिबिरामध्ये त्यांना डॉ. दांगट पशुधन सहायक विकास अधिकारी, डॉ. चंद्रशेखर जोगदंड सहाय्यक, डॉ.शुभम भिंगारे सहाय्यक, डॉ.अमोल लघाने व सचिन इथापे यांनी विशेष सहाय्य व मदत केली यावेळी डाॕ.थोरात यांनी रांजणगाव खुरी गाव व परीसरात एकही लम्पी बाधीत जनावर मिळाले नसल्याची माहिती दिली. तसेच राहिलेल्या रांजणी व रांजणगाव खुरी मधील जनावरांना दि.२१ सप्टेंबर रोजी लसीकरण व तपासणी शिबीर घेण्यात येईल असे सांगितले.