माजलगाव (प्रतिनिधी) माजलगाव धरणार डॉ. दत्तात्रय फपाल हे रविवारी सकाळी पोहण्यासाठी गेले असता पोहताना त्यांना दम लागल्याने त्यांचं पाण्यात बुडून मृत्यु झाला. त्यांचं मृतदेह शोधण्यासाठी कालपासून बीड.आणि परळी येथील जवान त्यांचा शोध घेत होते त्यांना मदत म्हणुन आज कोल्हापूर येथील एन डी आर एफ ची टीम माजलगाव येथील धरणात उतरली पण धरणात असणारे मच्छीमारांचे जाळे होते त्या जाळ्यात एन डी आर एफ जवान राजू मोरे शुभम काटकर हे दोन जवान अटकले त्यातील एक शुभम काटकर याला बाहेर काढण्यात बीडच्या टीम ला यश आलें. मात्र राजु मोरे (वय ३० वर्ष) या जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. राजु याला लवकर बाहेर काढण्यासाठी गळ लावला पण त्याचा ऑक्सीजन मास्क बाहेर आला आणि काही वेळ राजु याला बाहेर काढले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बराच वेळ पाण्यात राहिल्याने राजु मोरे याचा मृत्यू झाला. 

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं