अकोला

सततच्या पावसामुळे शहरातील नाले व रस्ते यांचे नियोजन बरोबर नसल्यामुळे तसेच सखोल भागात केलेल्या खोलीकरणामुळे दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब कार्यालय अकोला यांना माननीय शंकर किसनराव इंगळे वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष यांच्या वतीने निवेदन सादर केले आहे.

पंधरा ते वीस वर्षापासून बांधलेल्या नाल्याचा उपसा होत नसल्यामुळे शंकर नगर ,बापू नगर ,संत कबीर नगर, या भागातून राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे ,तेथील भाग उंच झाल्यामुळे, सर्व पाणी नाल्या मधून परत वस्तीमध्ये येते ,त्यामुळे नेहमीच नागरिकांच्या घरामध्ये पाणी साचते .तसेच गुडधी  भागातील पिकीव्ही नाल्याचे खोलीकरण केल्यामुळे  गुडधी भागात नाल्यांमध्ये पाणी सोडल्यामुळे नेहमीच पाऊस आल्यास नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरते त्यामुळे आपले स्तरावरून सर्वे करून संबंधित पूर्वग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी व नागरिकांना रस्ते व नाली सुविधा पुरविण्यात यावी अशी विनंती समस्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली यावेळी उपस्थित श्री मनोहर बनसोड सौ संगीता खंडारे श्री माणिक शेळके सौ प्रतिभा अवचार श्री सतीश जगताप श्री आकाश भगत आदी उपस्थित होते.