धक्कादायक घटना बचाव पथकातील एक जण पाण्यात अडकला.

सदरील घटनेची माहिती मिळताच बीड व परळी येथील आपत्कालीन पथकातील कर्मचारी व सर्व टीमने तळ्यात मृतदेहाचा दोन दिवस झाले शोध घेत असताना आज बचाव कार्यात मदत करणाऱ्या पथकातील दोन जवान शोध घेत असताना खोल पाण्यात उतरले होते.

परंतु यामध्ये एक धक्कादायक व खळबळ जनक घटना घडली आहे.पथकातील दोघेजण पाण्यात अडकल्याने त्यापैकी एक जण बेपत्ता झाला असून एकाला शोधून येथील हॉस्पिटलात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तर कोल्हापूर येथील NDRF पथकातील राजू मोरे यांचा बचाव करत असताना गॅस सिलेंडर वर आल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात यश आले नाही राजू मोरे यांचा जवळपास 45 मिनिटानंतर शोध लागलेला नाही तर पंधरा मिनिटानंतर काटकर शुभम या जवानाला बीडच्या पथकाने वर काढून त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.