जिंतूर. दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी आम आदमी पार्टी परभणीचे युवक जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुनिल शिवाजीराव बुधवंत यांनी आम आदमी पार्टी जिंतूरचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. मोहसीन पठाण यांच्या उपस्थितीत जिंतूर येथील अर्थसाक्षर फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जोगवाडा येथील ग्रामपंचायत सदस्य श्री. आदित्य पांचाळ यांचे समाजातील उल्लेखनीय कार्य पाहता त्यांची आम आदमी पार्टीच्या जिंतूर 'युवक तालुकाध्यक्ष' पदी नियुक्ती केली. 

आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल साहेब यांचे विचार व ध्येयधोरण राबविण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना देत त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. आम आदमी पार्टीच्या प्रतिमेला साजेशा सुसंस्कृत आणि सुशिक्षित व्यक्तीची निवड जिंतूर 'युवक तालुकाध्यक्ष' पदी झाल्याबद्दल श्री. आदित्य पांचाळ यांचे जिंतूर तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.