अकोला येथे श्रीमती कमलाबाई देशमुख औद्योगिक प्रशिक्षण संस्था कान्हेरी सरप दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी दीक्षांत समारोह आणि मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रवेश सत्र  सन 2020 ते 2022 चे वीजपत्री, तारतंत्री आणि जोडारी या तीन अभ्यासक्रमातून गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार आणि पदवी देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री राहुल देशमुख यांनी श्री विश्वकर्मा भगवान व सरस्वती देवी मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच संस्थेचे प्राचार्य श्रीमान उमेश लांडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्राचार्य श्री उमेश लांडे सर यांनी विद्यार्थ्यांना आयटीआयचे प्रशिक्षण घेतल्यानंतर पुढे कुठल्या क्षेत्रामध्ये व्यवसाय रोजगार स्वयंरोजगार करावा याचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक श्री पी एम चांदुरकर आणि आभार प्रदर्शन श्री ईधोल सर यांनी केले कार्यक्रमास उपस्थित श्री अशोक देशमुख सर प्राध्यापक भाकरे सर प्राध्यापक गीते सर आदी मान्यवर उपस्थित होते