शिवना- टाकळी धरण ९ ५ % भरले , आज करणार विसर्ग प कन्नड तालुक्यासाठी व वैजापूर तालुक्यातील हरित क्रांती घडवून आणण्यासाठी वरदान ठरलेल्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पात ९ ५.६२ टक्के साठा झाला आहे . धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही आवक सुरू असल्याने पाटबंधारे विभागाकडून डाव्या कालव्यात सोमवारी पाणी सोडण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती उपअभियंता स्वप्निल चुंगडा यांनी दिली . टाकळी , वैसपूर , लव्हाळी , शेवता , देभेगाव , देवळाना , पिंपळगाव , देवगाव रंगारी प्रकल्प , देवगाव रंगारी येथील प्रकल्पात अजूनही मोठा जलसाठा नाही . शिवना - टाकळीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यास देवगाव धरण झेपावणार आहे . या शिवना - टाकळी प्रकल्पावर शिवना - टाकळी प्रकल्पाचे छायाचित्र . पाणलोट क्षेत्रात १५०० ते २००० हेक्टर , उजव्या कालव्यावर ४०६ ९ , तसेच डाव्या कालव्यावर २३२० हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे . शिवना - टाकळी प्रकल्प ९ ५ टक्के भरल्याने येथील पाणी प्रश्नासह शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे