औरंगाबाद - (दीपक परेराव)ऑल इंडिया बंजारा टायगर तर्फे महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाज बांधवांना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळमार्फत थेट योजनेअंतर्गत एक लाखाचे कर्ज तात्काळ वितरित करण्यात यावे, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची भांडवल मर्यादा अकराशे कोटी रुपये करण्यात यावे, या महामंडळामार्फत एन बी सी एफ डी सी योजनेअंतर्गत एक ते दहा लाखापर्यंतची बंद केलेली योजना त्वरित सुरू करण्यात यावी व इतर कांही मागण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर औरंगाबाद येथे दिनांक ७ जुलै २०२२ रोजी ऑल इंडिया बंजारा टायगर तर्फे अशोक राठोड आणि त्यांच्या सहकार्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. उपोषणाला ७० दिवस होऊन ही शासनाने या उपोषणाची दखल घेतली नव्हती. शेवटी दोन दिवसांपूर्वी मराठवाडा मुक्तिदिनी आत्मदहन करण्याची घोषणा अभिवक्ता अशोक राठोड यांनी केल्यानंतर सरकारने या उपोषणाची दखल घेतली . काल शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्याची भेट घेऊन बेमुदत उपोषणा मागील सविस्तर भूमिका मांडली होती.
आज उपोषणाच्या ७३ व्या दिवशी राज्याचे सहकार व बहुजन कल्याण विकास मंत्री नामदार अतुल सावे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर चाललेले उपोषण स्थळी भेट देऊन त्वरित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत ऑल इंडिया बंजारा टायगरच्या शिष्टमंडळाची मुंबई येथे बैठक लावण्याचे तसेच पंधरा दिवसाच्या आत संबंधित मागण्या मान्य करण्याचे ठोस आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याविषयी आग्रह केल्यावरून ऑल इंडिया बंजारा टायगर तर्फे सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण मागे घेण्यात आले .
यावेळी ऑल इंडिया बंजारा टायगरचे अशोक राठोड यांनी मंत्री महोदयाच्या हाताने जलपान घेऊन उपोषण मागे घेतले. याप्रसंगी ऑल इंडिया बंजारा टायगरचे रतन कुमार नाईक ,राजू चव्हाण, मानसिंग राठोड, शंकर चव्हाण, प्राध्यापक फुलसिंग जाधव , डॉ. अशोक पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश पवार, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, गोर ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड, राष्ट्रीय बंजारा क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरखनाथ राठोड, विवेक राठोड , डॉ. मुकेश राठोड, मूलचंद चव्हाण, खुशाल राठोड, सुरेश चव्हाण, कैलास राठोड, अटलमतचे संपादक राजपाल सिंग, तांडा वार्ताचे संपादक संतोष राठोड, करतार राठोड, दिलीप राठोड, जयकुमार राठोड, दिनेश राठोड, नितेश राठोड , पंडित चव्हाण, विजय राठोड, भगवानगडचे सरपंच श्याम राठोड, कृष्णा राठोड , तन्मय राठोड, कैलास वडते , संतोष राठोड आदीसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
७३ दिवस चाललेल्या उपोषण काळात आमदार राजेश राठोड यांनी हे प्रकरण विधान परिषदेत स्थगन प्रस्तावाव्दारे मांडले, पोहरादेवी येथील राष्ट्रीय संत तपस्वी धर्मगुरू डॉक्टर रामराव बापू महाराज यांचे वंशज महंत श्री बाबूसिंग जी महाराज, गोर पिठाचे महंत श्री जितेंद्र जी महाराज, राष्ट्रीय संत तपस्वी धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराजांचे नातू महंत शेखर महाराज, संत रामराव बापू महाराजांचे परम शिष्य श्री प्रकाश पवार महाराज, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष श्री राजूभाऊ राठोड, गोर ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रविकांत भाऊ राठोड, राष्ट्रीय बंजारा क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गोरखनाथ राठोड, विश्व संत सेवालाल फाउंडेशन मराठवाडा विभाग अध्यक्ष श्री संदीप भैया राठोड, बंजारा क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री जयकुमार राठोड, साहित्यिक व सामाजिक विषयाचे अभ्यासक डॉ. अशोक पवार, प्राध्यापक फुलसिंग जाधव, सुप्रसिद्ध साहित्यिक याडीकार पंजाबराव चव्हाण , भगवानगड येथील श्री काळू महाराज, बंजारा क्रांती दलाचे प्रदेश अध्यक्ष श्री देवीदास भाऊ राठोड, विकास जाधव, अंबरवाडीकर, बंजारा पैंथरचे अध्यक्ष रोहिदास पवार, कवी तात्याराव चव्हाण, कवी पी. के. पवार, राज्यभरातील अनेक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, लेखक, कवींनी उपोषणाला जाहीर पाठिंबा देऊन उपोषणकर्त्यांना मानसिक पाठबळ दिले.
शिवाय पोहरादेवी येथील महंत श्री बाबुसिंग महाराजांनी रोजगार हमी योजना मंत्री माननीय नामदार संदीपान भुमरे यांची भेट घेऊन ऑल इंडिया बंजारा टायगर तर्फे करण्यात आलेल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मदत करण्याबाबत चर्चा केली होती, मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची भेट घडवून विमुक्त जातीय भटक्या जमाती समाज बांधवांना न्याय मिळवून मुख्यमंत्री यांची भेट घडवून देण्यासाठी प्रयत्न करीत होते तसेच शिवसेना शिंदे गटाचे औरंगाबाद ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री रमेश पवार यांनी वेळोवेळी सहकार व बहुजन कल्याण विकास मंत्री माननीय नामदार अतुल सावे यांच्यासोबत संपर्क करून सदरील बेमुदत साखळी उपोषण सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करीत होते.
तसेच राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री नामदार संजय राठोड यांच्याशी रमेश पवार, प्रकाश पवार महाराज , राजू राठोड आदींनी चर्चा केली होती. अनेक मान्यवर , संत , महंत, विविध सामाजिक संघटना, विचारवंत असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी या दीर्घ काळ (७३ दिवस ) चाललेल्या उपोषणाला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष ऊर्जा दिली. त्यामुळेच हे उपोषण ७३ दिवस चालले.
लढाई अजून संपलेली नाही. या घडीला फक्त आश्वासन मिळालेले आहे. ज्या दिवशी पदरात कांही पडेल त्या दिवशी ७३ दिवसीय उपोषण यशस्वी झाले असे म्हणता येईल. आज घडीला या उपोषणाची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. हीच एक समाधानाची बाब आहे असे ही यावेळी ऑल इंडिया बंजारा टायगर्सचे अशोक राठोड व त्यांचे सहकारी माध्यमांशी बोलत होते.