कन्नड : तालुक्यातील नाचनवेल परिसरात एकीकडे पिकावरील रोगराईमुळे शेतकरी हवालदिल झाला . वन्य प्राण्याकडूनही पिकांचे मोठे नुकसान होत असताना दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या . नुकसान झालेल्या पिकांची मा . आमदार नामदेवराव पवार यांनी पाहणी केली . पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करण्यासाठी शासन दरबारी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी सरपंच गजानन म्हस्के , गणेश शिन्दे , पंजाबराव शेळके , महादु आग्रे , विष्णू गायकवाड , मा.सरपंच रामेश्वर आग्रे , साहेबराव गायकवाड , पो.पा. कृष्णा आग्रे , , कैलास आग्रे , विष्णू आग्रे , अनिल आग्रेंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते . डोंगरगाव परिसरामध्ये सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला . पावसात मका अक्षरशः आडवी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे . नुकसान झालेल्या पिकांची मा . आमदार नामदेवराव पवार यांनी पाहणी केली . परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला . नाचनवेल , डोंगरगाव , आमदाबाद , मोहरा , टाकळी शाहू , सारोळा , कोपरवेल , जवखेडा बुद्रक , जवखेडा खुर्द , पिंपरखेडा , नादरपूर येथील शेतातील मका पीक भूईसपाट झाले