सकल मातंग समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्षपदी अविनाश भाऊ मिसाळ यांची निवड..

पैठण प्रतिनिधी:- सकल मातंग संघर्ष समिती हि संघटना मागील काही महिन्यांपासून समाज बांधवांना जोडण्याचे काम करत असुन या संघटनेत मोठ्या प्रमाणावर युवावर्ग जोडला गेला आहे.तसेच सकल मातंग समाज संघर्ष समितीच्या वतीने पैठण तालुक्यात अनोखा उपक्रम आणि कार्यक्रम व रॅली चे आयोजन करण्यात आले होते.तसेच सकल मातंग समाज संघर्ष समिती हि संघटना प्रत्येक गावात,वाड्या वस्त्या वर जाऊन समाज जनजागृती आणि विविध कार्यक्रमांचे नियोजन करत समाजात आमुलाग्र बदल व परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

आज दि 18 रोजी जल बिजली पंप हाऊस,जायकवाडी धरण येथे सकल मातंग संघर्ष समितीच्या कार्यकारीणी गठित करण्याच्या मुद्यावर बैठक पार पडली.यामध्ये तरुण वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला त्या वेळी सकल मातंग समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या सर्वांचे मते अविनाश भाऊ मिसाळ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली."सकल मातंग समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य "यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तथा समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.यावेळी जेष्ठ पत्रकार मनेशजी आव्हाड साहेब, सामाजिक कार्यकर्ते रमेशजी शिंदे सामाजिक कार्यकर्तेअंकुशजी अंवचिंदे साहेब, भारतजी मोघे साहेब, नामदेव शरणागत साहेब, ज्ञानेश्वर भाऊ मिसाळ, पत्रकार रविंद्र गायकवाड,प्रकाशजी गायकवाड, संदीप भाऊ साबळे, भगवान भाऊ मिसाळ, अमोल ताकवाले साहेब, अनिल, ताकवले, अमोल जगधने,दिपक आवचिंदे,जीवन मिसाळ, आकाश मिसाळ,शाम पाटोळे, आकाश शिंदे, निलेश अंवचिंदे,अजय आगाम,राहुल जाधव, योगेश जाधव, राहुल जाधव, योगेश अंवचिंदे, रोहित अंवचिंदे, संदीप गायकवाड, रोहित अहिरे, नितीन बावस्कर, गणेश चव्हाण, नितीन शरणागत, राहुल मिसाळ, राकेश शिंदे, संतोष मिसाळ, अविनाश मिसाळ (कातपुर), रविंद्र मिसाळ, आकाश नाडे,सुमीत नाडे,आरूण नाडे, विलास नाडे, सुदर्शन मावस आदींसह पैठण तालुक्यातील पसमाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश भाऊ मिसाळ यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समाजबांधवांच्या वतीने अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा हि देण्यात आल्या...

रविंद्र गायकवाड, बिडकिन