सहा ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे मतदान सुरू पोलीस प्रशासनाचा मतदान केंद्रावर तगडा बंदोबस्त
औंढा नागनाथः- तालुक्यातील सहा ग्रामपंचायतच्या निवडणुक सुरु आहे. दोन ग्रामपंचायत त्यामध्ये काठोडातांडा व तामटी तांडा या बिनविरोध झाल्या असून चार ग्रामपंचायत चिंचोली निळोबा ,लक्ष्मणनाईक तांडा, पिंपळा, संघनाईक तांडा या चार ग्रामपंचायतची निवडणूक सुरु आहे.१८ सप्टेंबर सकाळीपासुन मतदान सुरु आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत चार ग्रामपंचायत मध्ये ६७.७१ टक्केवारी मतदान झाले अशी माहिती तहसीलदार डॉ कृष्णा कानगुले यांनी दिली .तालुक्यातील चार ग्रामपंचायत मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. चार ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान केंद्रावर पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लांडगे, पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील ,पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा वाळके यांच्यासह सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अफसर पठाण, पोलीस हवालदार संदीप टाक ,बापुराव चव्हाण,गजानन गिरी ,गणेश गायकवाड,डी बी बांगर, इम्रान पठाण ,अमोल चव्हाण ,वाशिम पठाण यांनी चार ग्रामपंचायतच्या मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवला. सहा ग्रामपंचायत च्या निवडणुकीसाठी निवडणूक नायब तहसीलदार सचिन जोशी ,शैलेश वाईकर हे परिश्रम घेत आहेत .
फोटोओळः- औंढा नागनाथ येथील पिंपळा ग्रामपंचायतची निवडणूक सुरू आहे. त्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा.