चर्‍होली खुर्द ग्रामपंचायतीमध्ये झालेली अनियमितता न दाखविण्यासाठी सहायक लेखापरीक्षण अधिकार्‍याने ग्रामविकास अधिकार्‍याकडे 30 हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. ही कारवाई पीसीएस चौक आळंदी येथे करण्यात आली. महेश एकनाथ म्हात्रे (वय 42, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या सहायक लेखा परीक्षण अधिकार्‍याचे नाव आहे.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ परशुराम जगदाळे (वय 55, रा. राजगुरूनगर) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या अखत्यारीत असलेल्या ग्रामपंचायतीच्या लेखा परीक्षणामध्ये अनियमितता न दाखवणे, तसेच वसुलीचा अहवाल न पाठविण्यासाठी 30 हजारांची लाच मागितली. त्याबाबत फिर्यादी यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने गुरुवारी (दि. 15) सायंकाळी सहा ते शुक्रवारी (दि. 16 ) सायंकाळी साडेपाच वाजेच्या कालावधीत सापळा लावून आरोपी सहायक लेखा परीक्षण अधिकार्‍याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.