बीड येथील पत्रकार परिषदेत माहिती जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे

बीड (प्रतिनिधी) दि.18 येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्व संध्येला दि 04 सप्टेंबर 22 रोजी नागपूर या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जगप्रसिद्ध लाँगमार्च प्रणेता तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेन्द्र कवाडे सर यांच्या अध्यक्षतेखा, भीमसैनिकांचा राष्ट्रीय मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.

दि.04 सप्टेंबर मंगळवार रोजी नागपुरातील धंतोली मधील रहाटे कॉलनी चौकातील लक्ष्मी मंगल कार्यालय येथे सांयकाळी 05 वाजता भीमसैनिकांच्या विशाल अशा राष्ट्रीय मेळाव्याला पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा प्रा. जोगेन्द्र कवाडे सर हे मार्गदर्शन करणार आहे. 'देशभरातून विविध राज्यातून पक्षाचे हजारो भीमसैनिक, कार्यकर्ते

मेळाव्यात सहभागी होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे प्रभारी गोपाळराव आटोटे यांचे हस्ते उद्घाटन केल जाणार आहे. त्याचबरोबर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवानेते भाई जयदिप कवाडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये होणाऱ्या या मेळाव्याला देशभूशमीकवृक्षाचे राज्य प्रमुख व नेतेमंडळी उपस्थित राहतील.अशी माहीती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी बीड येथे कार्यकर्त्यांच्या बैठका प्रसंगी बोलताना दिली.

मराठवाड्याच्या झंझावती दौन्यावर असतांना गेवराई शिरूर पाटोदा व नंतर आज बीड येथे आले असता दिली पत्रकार परिषदेत माहिती कार्यकर्त्यांच्या बैठकी, प्रसंगी मार्गदर्शन करतोना चरणदास इंगोले यांनी यावेळी सांगीतलेळी, आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका ह्या सर्व ताकदीनीशी स्वबळावर लढविण्याची जोरदार तयारी केल्या जात आहे. स्वबळावरची तयारी करण्यात येत असली तरी मेळाव्या प्रसंगी सदर निवडणूका हया कॉंग्रेस व्यतिरिक्त अन्य समविचारी पक्षासोबत आघाडी करून लढवायच्या किंवा नाही याबाबतचा अंतिम निर्णय पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा. प्रा. जोगेन्द्र कवाडे सर जाहीर करणार असल्याची माहीती चरणदास इंगोले यांनी बीड़येथे विश्रामगृहावर दि.१८ सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यकत्यांच्या बैठकी प्रसंगी दिली.

पक्षाचे " कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश पीआरपी चरणदास इंगोले, सह बीड जिल्हा अध्यक्ष अनिल तुरूकमारे यांच्या. अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीला जिल्हयाताल बहुसंख्येने कार्यकर्ते,उपस्थित राहणार आहेत,अरूण सवाई,दत्तात्रय सौंदरमल,शेखा फिरोज आदी पदाधिकारी उपस्थित होते.