✍️✍️जिंतूर प्रतिनिधी✍️✍️

            *माबुद खान*

जिंतूर: तालुक्यातील रस्ते वितरणाबाबत मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने जिंतूर ते औंढा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावेत.तसेच भुसकवडी गावाला रहदारीसाठी स्वातंत्र्यापासून रस्ता उपलब्ध नसल्यामुळे तेथील नागरिकांनी मागील विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला होता.तरीही शासनाने या बाबी कडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्या अरुणा अविनाश काळे यांनी याबाबत जिल्हाधिकारी, महवितरण अधिकारी, व राष्ट्रीय महामार्ग कार्यालय येथे निवेदन देवून जिंतूर ते औंढा राष्ट्रीय महामार्गावर झालेले खड्डे तत्काळ दुरुस्त करणे, आडगाव बाजार व इटोली सबस्टेशन येथे ५ एम व्ही चे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावे, भुसकवडी फाटा ते भुसकवडी रस्ता जिल्हा परिषदेच्या सण २०२२-२३ नियोजन आरखड्यात मंजूर करणे, इटोळी – मांडवा – डोंगरतळा- घेवंडा या फिडर वर अतिरिक्त भार विभाजन करून स्वतंत्र फिडर बसवणे,इटोली- गडाढव्हण – मोहखेड – सोरजा फिडर ची तत्काळ दुरुस्ती करून मंजूर असलेले फिडर चे काम तत्काळ पूर्ण करणे, इटोली – दाभा – दिग्रस फिडरची तत्काळ दुरुस्ती करून स्वतंत्र फिडर करणे, आडगाव – टाकळखोपा- श्रीरामवाडी- भुसकवडी फिडर ची दुरुस्ती करून स्वतंत्र फिडर बसवणे, आडगाव – टाकलखोपा – श्रीरामवाडी हा रस्ता जिल्हा परिषदे मार्फत मंजूर करणे, मौजे देवसडी येथे फलाटवाडीकडे जाणारा रस्ता खुला करणे या मागण्यासंदर्भात दि.१७ सप्टेंबर रोजी पर्यंत मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशी मागणी केलेली होती. त्या अनुषंगाने आज (दि.१७) रोजी आडगाव फाटा येथे शेकडो नारिकांच्या उपस्थितीत सकाळी ११ते १ या वेळेत रोको आंदोलन करण्यात आले. या रस्ता रोको आंदोलनाला यश मिळाले असल्याने नागरिकांत व शेतकरी यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आंदोलनात काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, जिल्हा परिषद सदस्या अरुणा काळे, राजेंद्र नागरे, अविनाश काळे, राम घुगे, कृष्णा दुधगावकर, पवन भालेराव, जगनराव काळे, महेश सांगळे, तहेसिन देशमुख, प्रभाकर कुरे, माऊली नागरे, निवास घुगे, गोविंद खंडागळे, बालाजी खंडागळे, मिलिंद डोके, नाना निकाळजे, बाबाराव चिलगर, मारुती घुगे, विश्वनाथ घुगे ,शिवाजी काळे,विष्णू काळे, रहीम कुरेशी, सचिन कुटे, विकास शिंदे, नितीन पाटील व पुप्पु पाटील, रखमाजी खिल्लारे, रुक्मिणीबाई ईंगोले, रामकिसन नागरे, बबनराव कवडे, बाबुराव शेळके, कैलास कवडे, श्रावण खिल्लारे, जयकुमार खिल्लारे, बाळू खंडागळे ,प्रकाश राऊत यांच्यासह

अनेक नागरिक उपस्थित होते.