हिंगोली शुभंकरोती फॉउंडेशन नांदेड व देसाई फॉउंडेशन ट्रस्ट स्कोर एसई इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय विद्या मंदिर शिक्षण संस्था द्वारे संचलीत श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे विद्यालयात गुरुवार दि.१५ ते १६ सप्टेंबर रोजी दरम्यान मासिकपाळी व आरोग्यविषयक जनजागृती  अभियान राबविण्यात आले. य
श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे विद्यालयात दोन दिवशीय शुभंकरोती फॉउंडेशन व देसाई फॉउंडेशन ट्रस्ट स्कोर एसई इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांना मासिकपाळी व आरोग्यविषय जनजागृती शिबिर घेण्यात आले. यावेळी फॉउंडेशनच्या जिल्हा महिला समन्वयक वैशाली सूर्यवंशी यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळी विषयी असलेले गैरसमज, आहार, व्यायाम व तरुण अवस्थेत शरीरात होणारे बदल व मुलींचा सुरक्षितते विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शाळेतील मुलीची संख्या लक्षात घेता दोन दिवस त्यांनी मुलींना स्वतःच्या आरोग्यविषयक बाबी समजून सांगितल्या. फॉउंडेशन तर्फे सर्व मुलींना सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.प्रकाश अंभोरे, महिला शिक्षक व लोळवरकर आदींनी सहकार्य केले.