सहा वर्षीय मुलीसह इमारतीवरून उडी मारून महिलेने संपवलं जीवन

भाईंदर : मिरा रोड येथे एका महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलीसह सहा मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून काशी मिरा पोलीस पुढील तपास करत आहेत.मिरा रोड येथील शांती गार्डन भागातील नित्यानंद नगर येथील गौरव गॅलेक्सी या सहा मजली इमारतीत दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इमारतीमधील सीसीटीव्ही मध्ये ही महिला आपल्या सहा वर्षांच्या मुलीला लिफ़्ट मधून गच्चीवर घेऊन जाताना दिसून आली आहे. त्यांनतर थोड्याच वेळात दोघींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले सुरक्षा रक्षकला दिसून आले. त्याने याची माहिती महिलेच्या पतीला व पोलिसांना दिली.दोघींना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही महिला आपल्या पती व सहा व तीन वर्षीय मुलींसह इमारतीच्या तळमजल्यावर रहात होती. घटना घडली तेव्हा महिलेची लहान मुलगी एकटीच घरात होती. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून काशी मिरा पोलीस पुढील तपास करत आहेत.