औरंगाबाद:- दि.१६ स.(दीपक परेराव)महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी नामदार एकनाथ शिंदे यांना वाॅर्ड क्र.९० मुकूंदनगर,राजनगर गेट नं.५६ ते चिकलठाणा रेल्वेस्टेशन लगत येथील झालेल्या रस्त्याची दुरवस्था बाबत  सर्व पक्षीय निवेदन देण्यात आले. या वॉर्डातील रस्त्याच्या समस्येला नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांना रस्त्याने चालणे कठीण झाले असून, या वॉर्डातील रस्त्याच्या कामासाठी एक कोटीचा निधी तात्काळ मंजूर करून कामाला सुरूवात करण्यात यावे.अशी मागणी केली असून,या विषयावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली.त्यांनी सांगितले की,तुम्हाला तात्काळ मुख्यमंञी सहाय्यता निधी मंजूर करून देतो असे यावेळी नमूद केले. या निवेदनात त्यांनी असेही नमूद केले की,आम्ही आपणास विनंती करतो की ,स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांचे अपघाती निधन झाले.त्यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांना विधान परीषदेवर घेऊन त्यांना मंञीपद देण्यात यावे आणि आण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना पुन्हा एकदा महामंडळाचे अध्यक्ष करण्यात यावे तसेच पोलिस निरीक्षक बकले यांना सेवेमधून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली.

 यावेळी बाळासाहेब भगनुरे पाटील (युवक शहर जिल्हाध्यक्ष,शिवसंग्राम संघटना), लक्ष्मण नवले सर(प्रदेश प्रवक्ते शिवसंग्राम),अर्जून गिरे (संस्थापक अध्यक्ष,बहुजन विकास माथाडी आणि जनरल कामगार संघटना),राजेंद्र म्हस्के (शहराध्यक्ष,भिमकायदा संघटना), संतोष उनवणे (बहुजन माथाडी कामगार संघटना),नागेश दांडाईत (युवक शहर उपाध्यक्ष,शिवसंग्राम संघटना),विराज जोगदंड(सोशल मिडीया प्रमुख,शिवसंग्राम संघटना,म.रा),विशाल सोळंके पा,संजीव सावंत,गंगाधर गव्हाणे,सूरज मगरे,पकंज उदरभरे,रवी जाधव आदी उपस्थित होते.