कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील

              सणसवाडी औद्योगिक क्षेत्रातील निओसीम इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन चे कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात ५ वा वेतन वाढ करार शांततामय वातावरणात संपन्न झाला. यावेळी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अशी १३ हजार ५०० रुपयांची पगार वाढ करण्यात आली. या करारामुळे सध्या कामगारांचे वेतन हे ५० हजार रुपये इतके झाले आहे. कामगार हित जोपासत करार संपन्न केल्याबद्दल संघटनेचे राज्य अध्यक्ष माजी आमदार, माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांचा कामगार संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ व वारकरी पगडी देऊन सत्कार आला. 

             हा करार संपन्न करण्यासाठी कामगार संघटनेच्या वतीने राज्य सरचिटणीस विठ्ठल गोळे, शिरूर अध्यक्ष विकास मासळकर, कामगार प्रतिनिधी हेमंत हरगुडे, हिरामण दरेकर, राहुल दरेकर, योगेश मेमाणे, निलेश दरेकर आदी प्रतिनिधींनी व कंपनी व्यवस्थापनच्या वतीने व्हाईस प्रेसिडेंट स्वप्नील जठार यांनी वेतन वाढ करारावर स्वाक्षरी केली. यावेळी संघटनेचे कामगारांनी एकमेकांनी पेढे भरवून आनंद साजरा केला.