कळमनुरी तालुक्यातील 250 अंगणवाडी केंद्र धुरमुक्त होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली असून तर आतापर्यंत 130 अंगणवाडी केंद्रांना गॅस संचाचे वाटप करण्यात आले आहे.हिंगोली जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी मधून बालकांना शालेय पोषण आहार पुरवला जात असून त्यामुळे भट्टीत लाकडे घालून पोषण आहार शिजवून दिला जातो त्यामुळे धुरापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्यामुळे कळमनुरी तालुक्यातील 250 अंगणवाडी केंद्र धुरमुक्त होणार असून आत्तापर्यंत 130 अंगणवाडी केंद्रांना गॅस संचाचे वाटप करण्यात आले आहे.तर आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पोतरा ग्रामपंचायत अंतर्गत तीन अंगणवाडी केंद्रांना आज गॅस संचचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच नागरिक अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.