सेनगांव तालुक्यातील गोरेगांव या ठिकाणी गोरेगांवसह चार मंडळे अतिवृष्टी निधी मधून वगळल्याने शेतकऱ्यांच्या वतीने संप पुकारण्यात आला असून आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी सलग दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून रॅली काढुन व तसेच टायर पेटवून आपला निषेध व्यक्त केला आहे.जुलै महिन्यामध्ये सेनगांवसह जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाच्या वतीने अतिवृष्टी निधी मंजूर करण्यात आला आहे.मात्र सेनगांव तालुक्यातील गोरेगांवसह काही मंडळे अतिवृष्टी निधी मधून वगळल्याने शेतकऱ्यांनी गोरेगांव या ठिकाणी संप सुरू केला आह.तर आज शेतकऱ्यांनी रॅली व टायर पेटवून आपला निषेध व्यक्त केला आहे.