क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या ६८ शिफारशी संदर्भातील शासन निर्णय तात्काळ पारित करा,अन्यथा १२ डिसेंबर रोजी मराठवाडा बंद

"सकल मातंग समाज अन्याय विरोधी कृती समितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे इशारा...

औरंगाबाद/

 क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या ६८ शिफारशी संदर्भातील शासन निर्णय तात्काळ पारित करण्यात यावे अन्यथा १२ डिसेंबर २०२२ रोजी मराठवाडा बंद ठेवण्यात येईल असा इशारा सकल मातंग समाज अन्याय विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने आज (ता.१७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे,

  प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन. ०१ ऑगस्ट २००३ रोजी स्थापन झालेल्या क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने ८२ शिफारशी संदर्भातील आपला अहवाल दिनांक ३१/०८/२००८ आणि १०/०९/२००८ रोजी सादर केलेला आहे, तात्कालीन सरकारने ८२ पैकी ६८ शिफारशी संदर्भातील शासन निर्णय मान्य केले मात्र मागील १४ वर्षांत या संदर्भात एकही शासन निर्णय पारित करण्यात आला नाही, हे शासन निर्णय तात्काळ पारित करावेत, अनुसूचित जाती आरक्षणाचे अबकड वर्गिकरण करण्यात यावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (आर्टी) स्थापन करण्यात यावी, मातंग समाज बांधवांवर वारं वारं होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या घटनाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशाची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात यावी, अनुसूचित जाती ची १०.५% लोकसंख्या आणि नव बौद्ध बांधवांची ०६% लोकसंख्या एकत्र करून अनुसूचित जातीला १६.५% लोकसंख्ये प्रमाणे आरक्षण, निधी व राजकीय प्रतिनिधित्व देण्यात यावे, अल्पसंख्याक संस्था मध्ये अनुसूचित जातीला नाकारण्यात आलेले आरक्षण पुर्वरत सुरू करावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास बॅंकेचा दर्जा देण्यात यावा आणि कालबाह्य कर्ज योजना बंद करून नाविन्यपूर्ण कर्ज योजना सुरू करण्यात याव्यात, क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाचे पुनर्गठन करण्यात यावे, घातपाती मृत्यु झालेल्या व मारहाणीत अपंगत्व आलेल्या प्रत्येक कुटुंबाला ५० लाखाची आर्थिक मदत व पुनर्वसन करावे, श्री, क्षेत्र शेंद्रा देवस्थान विकासासाठी श्री. मांगवीर बाबा देवस्थान विकास प्राधिकरण स्थापन करण्यात यावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत,

 या निवेदनावर *सकल मातंग समाज अन्याय विरोधी कृती समितीचे* समन्वयक संतोष पवार, *लहु प्रहार संघटनेचे* राज्य कार्याध्यक्ष नितीन आव्हाड, *क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग अंमलबजावणी कृती समितीचे* राहुल घोरपडे, *अनुसूचित जाती जमाती अन्याय ग्रस्त पुनर्वसन संघर्ष समिती* चे मुकेश जाधव, *माजी पंचायत समिती* सदस्य काकासाहेब नाडे, *भारतीय दलित संसदेचे* विलास खोतकर, युवा नेते समाधान ईच्चे, सोशल मीडिया प्रमुख विकास जाधव आदींची नावे आहेत.