आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे यांच्या पाठपुराव्यास यश : धारासुर ग्रामस्थांकडून आ.गुट्टेंचा सत्कार

गंगाखेड :- तालुक्यातील धारासूर येथे अकराव्या शतकातील प्राचीन व ऐतिहासिक असे गुप्तेश्वर मंदिर आहे. हेमाथपंथी स्वरूपाचे असलेल्या या मंदिर निर्मितीत स्थापत्य, दगडी आणि शिल्प कलांचा संगम दिसतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून ते जीर्ण अवस्थेत आहे. त्याचा बराचसा भाग कोसळला असून भविष्यात प्रचंड हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे यांनी प्रत्यक्ष पाहाणी करून संबंधित विभागात पत्रव्यवहार करून जीर्णाेध्दारासाठी निधी देण्याची मागणी केली होती.

त्यानंतर या विषयावर त्यांनी तत्कालिन उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सचिवांची प्रत्यक्ष भेट घेवून वारंवार पाठपुरावा केला होता. मंदिराच्या जीर्णाेध्दाराचा विषय लवकर निकाली लागावा म्हणूनही आ.डाॅ.गुट्टे यांनी विधानसभेतही तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 

पुढे महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेउन स्मरणपत्र दिले होते. त्यामुळे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी धारासूर येथील मंदिराच्या जीर्णाेध्दारासाठी तब्बल २१ कोटींच्या निधीची घोषणा केली.  

दरम्यान, गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णाेध्दारासाठी मुख्यमंत्र्यांनी २१ कोटींची घोषणा केल्याची बातमी ऐकताच धारासुर ग्रामास्थांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. तसेच गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावल्याबद्दल आ.डाॅ.गुट्टे यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचा नागरी सत्कार करून त्यांचे आभार मानले. 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, विधानसभा अध्यक्ष कृष्ण सोळंके, राजेभाऊ (बापू) सातपुते, पत्रकार पिराजी कांबळे, अभिजीत चक्के, निवृत्ती कदम, दगडू जाधव, प्रतापराव कदम, बालासाहेब नेमाने, लक्ष्मण कदम, बालासाहेब पत्तेवार, तुकाराम यादव, संदीप कदम, पप्पू कदम, लक्ष्मण कदम, राजेभाऊ कदम, गणेश कदम, उत्तम कदम, संभाजी ढेंबरे, लक्ष्मणराव कदम उपस्थित होते.

चौकट...

ना.एकनाथ शिंदे आणि ना.देवेंद्र फडणवीस यांचे आभार - आ.डाॅ.गुट्टे 

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या पहिल्याचं भेटीत अनेक कामे आणि निधी प्रलंबित असल्याचेे मी त्यांना सांगितले होते. त्यामुळे त्यांनी मला मार्गी लावण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार वर्षानुवर्ष मतदार संघात प्रलंबित असणा-या अनेक विकास कामाासाठी मंजुरी व निधी मिळत आहे. गेल्या दीड वर्षापासून मी पाठपुरावा करीत असलेला मंदिराचा विषय आज मार्गी लागला. तसेच त्यासाठी मला अपेक्षित असलेला निधींही मिळाला, त्यामुळे मला प्रचंड आनंद झाला आहे. म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. तसेच भविष्यातही असे अनेक प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ.डाॅ.गुट्टे यांनी सांगितले आहे.