औरंगाबाद :- १७ स.(दीपक परेराव)शिवसेनेच्या वतीने आज १७ सप्टेंबर शनिवारी रोजी सकाळी ९:०० वाजता स्वतंत्रपणे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार उदयसिंह राजपूत माजी महापौर नंदकुमार घोडेले,पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
निजामाच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले,निजामाच्या जोखडातून मुक्त झालेला दिवस म्हणजे १७ सप्टेंबर, आजचा दिवस स्वातंत्र सैनिकांना अभिवादन करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो,दरवर्षी सकाळी ०९ वाजता मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन अभिवादनाचा कार्यक्रम घेतला जातो. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ०९ ऐवजी सकाळी ०७ वाजताच कार्यक्रम घेतला तसेच १५ मिनिटांतच हा कार्यक्रम आटोपता घेतला, म्हणूनच शिवसेनेच्या वतीने पुन्हा सकाळी ०९ वाजता नेहमीच्या वेळेप्रमाणे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अभिवादनाचा कार्यक्रम घेतला.
यावेळी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले की,सकाळी जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडल असलं, तरी शिवसेनेच्या वतीने पुन्हा एकदा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा कार्यक्रम घेतला गेला.कारण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ९:०० वा.साजरा केला जातो. दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमापेक्षा यंदा मुख्यमंत्री शिंदे यांनी थोडक्यात हा कार्यक्रम आटोपता घेतला, ही मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी असंख्य हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाची प्रतारणा आहे, असा आरोप करत शिवसेनेनं नाराजी व्यक्त केलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हैदराबादला रवाना होणार आहेत. हैदराबादमध्ये महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक, या तीन राज्यांचा मिळून मुक्तिसंग्रामाचा एक संयुक्त कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता यावं, यासाठी औरंगाबादमधील ध्वजारोहणाचा कार्यक्रम लवकर घेण्यात आला होता. दरम्यान यावरुन शिवसेनेनं मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केलीय.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रमाची वेळ बदलली,पंधरा मिनिटात कार्यक्रमात आटोपता घेतला, हे मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे, या ठिकाणी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांना भेटायला बोलायला वेळ सुद्धा नाही, हैदराबादच्या कार्यक्रमाला महत्व दिले गेले हा मराठवाड्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे याकडे लक्ष दिले पाहिजे.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, विनायक पांडे,बंडु ओक,आनंद तांदुळवाडीकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक राजू वैद्य, प्रभाकर मते,मकरंद कुलकर्णी,गजानन बारवाल, कमलाकर जगताप,किशोर नांगरे, दिग्विजय
शेरखाने, राजेंद्र दानवे ,हिरा सलामपुरे, जयसिंह होलिये, संजय हरणे, माजी शहरप्रमुख बाबासाहेब डांगे, रखमाजी जाधव, सोपान बांगर, वैभव सालपे,जिल्हासंघटिका प्रतिभाताई जगताप,सुनिता आऊलवार, सुनिता देव,अंजली मांडवकर, आशा दातार, मीरा देशपांडे, कविता सुरळे,राजश्री राणा,सुचिता अंबेकर आदींची उपस्थिती होती.