परभणी,(जिमाका) दि.17 :- भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा मुक्ती संग्रामातील थोर हुतात्मे व स्वातंत्र्य सैनिक यांनी स्वातंत्र्य लढ्यात केलेल्या महान कार्यावर आधारित परभणी येथील मराठवाडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्र प्रदर्शनास सहकार मंत्री अतुल सावे यांनी आज भेट दिली.
परभणी येथील मराठवाडा हायस्कूलच्या श्रीमती खटींग, अविनाश कंधारकर, अमोल गोरकटे, गोपाळ रोडे आणि अविनाश जोशी यांच्या मागदर्शनाखाली 120 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य संग्राम लढ्यात केलेल्या महान कार्याची माहितीसह आकर्षक चित्र रेखाटले आहे. या चित्रप्रदर्शनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी आमदार मेघनाताई बोर्डीकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदींची उपस्थिती होती.