आईवडील कळाले , तर जग कळायला वेळ लागत नाही कन्नड येथे अविनाश भारती यांचे प्रतिपादन प्रतिनिधी कन्नड मायबापाचे स्वप्न पूर्ण करण्यात जी मजा आहे ती जगाच्या पाठीवर कुठेच नाही . ' मातृ देवो भव , पितृ देवो भव , आचार्य देवो भव ' ही संस्कृती तुम्ही साभाळली यशाच्या तर शिखरापर्यंत अविनाश भारती पोहोचाल . ज्याला आई वडील कळले त्याला जग कळायला वेळ लागत नाही , असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी व्याख्याते अविनाश भारती यांनी केले . कन्नड शहरातील युवा उद्योजक मनोज पवार यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात शुक्रवारी ते बोलत होते . तुमच्या मायबापाला लोकांनी चांगलं म्हणावे यासाठी यशस्वी व्हा , असे त्यांनी सांगितले . या वेळी युवा उद्योजक मनोज पवार , जिजामाता प्रसारक मंडळाचे सचिव सागर जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक मनोज पवार यांनी केले . सूत्रसंचालन प्रवीण दाभाडे यांनी केले , तर विकास बनकर यांनी आभार मानले . या वेळी पुष्पामाई पवार , महिला उद्योजिका ऊर्मिला पवार , कन्नड आगाराचे प्रमुख कमलेश भारती , तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल शिरसे , संदेश पवार , मनोज सोनवणे आदी उपस्थिती होते . यशस्वितेसाठी संतोष बनकर , सुनील शिरसाठ , प्रवीण घाडगे , सचिन काळे , सागर काळे , सोमनाथ दाभाडे , देवचंद घडुरसिंग , सौरव शिंदे , कुणाल शिंदे , गणपत पाखरे , रणजित नस्वत विकास बनकर आदींनी " 3 अविनाश भारती म्हणाले , तुमच्या वागण्यामुळे बापाला टोपी काढून घाली ठेवावी लागेल असे वाईट कृत्य करू नका . तुमच्यामुळे परिश्रम घेतले .