नाथसागर धरणाच्या आपत्कालीन दरवाजासह सर्वच २७ दरवाजे उघडले

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

पैठण(विजय चिडे)पैठण येथील नाथसागर धरणामध्ये इतर धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर  सुरू असल्यामुळे धरणाच्या आपत्कालीन दरवाजासह यावर्षी प्रथमच २७ दरवाजे खुले करण्यात आले आहेत. गोदावरी नदीत ८० हजार १७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, शाखा अभियंता विजय काकडे यांनी घेतला. यामुळे पुन्हा एकदा गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे.

शुक्रवारी (दि. १६) रोजी नाथसागर धरणाच्या पाणीलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वाढू लागला. दरम्यान पाणी पातळी वाढल्यामुळे सर्वच दरवाजासह धरणाचे क्रमांक १ ते ९ असे एकूण ९ आपत्कालीन दरवाजे पाच फूट खुले करण्यात आले आहेत. गोदावरी नदीमध्ये ८० हजार १७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे गोदावरी नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहत असून नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन प्रमुख तहसीलदार शंकर लाड यांनी केले आहे.