आष्टी प्रतिनिधी 

आष्टी येथील डिप्लोमा इन इंजिनिअरिंग व टेकनॉलॉजी (पॉलिटेक्निक) मध्ये 15 सप्टेंबर रोजी "इंजिनीअर्स डे " मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात इंजिनिअर्स डे साजरा करण्यात येतो. अखिल मानव जातीचे जीवन कल्याणकारी व सुखमय बनविण्यामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्राचे खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सर्व अभियंत्यांना मानवंदना देऊन हा दिवस साजरा केला जातो.संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ डी .बी राऊत , श्री थोरवे शिवाजी साहेब (स्वीय सहायक), इंजिनिअर बाळासाहेब भुकन ,इंजिनिअर पी.बी. बोडखे, प्रा.गहिनीनाथ डोंगरे , प्रा.देशपांडे वाय.एस. , प्राचार्य संजय बोडखे , इंजिनिअर बाळासाहेब बोडखे यांनी डॉ. विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी सर्व विभाग प्रमुख व शिक्षक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना डॉ. डी बी राऊत यांनी आपल्या मनोगतात डॉ. विश्वेश्वरय्या यांचा जीवनपट उलगडला. इंजिनिअर बाळासाहेब भुकन यांनी इंजिनिअरिंग नंतर च्या संधी इंजिनिअर चे महत्व विद्यार्थी यांना पटवुन सांगितले. पी बी बोडखे यांनी उत्कृष्ट अभियंता म्हणून करिअर करण्यासाठी विविध प्रकारची कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत असे आवाहन केले. प्राचार्य संजय बोडखे यांनी कॉलेजमार्फत साजरा केल्या जाणाऱ्या इंजिनिअर्स डे चे हे बारा वर्ष असून राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे इंजिनिअर्स घडविण्यासाठी कॉलेज कटिबद्ध असल्याचे सांगितले. यानंतर डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. कॉलेजच्या सिव्हिल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर या तिनही विभागांतर्फे नविन विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर पार्टी चे आयोजन करुन स्वागत करण्यात आले. यावेळी वनिता बांगर, मुजाहिद शेख, श्वेता गोरे, राठोड मोनिका,अश्विनी खोटे, दिनेश कुऱ्हाडे, सचिन शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमासाठी प्रा.संदिप धोंडे, प्रा.खिलारे एस. एस, प्रा परदेशी ए. बी. , प्रा.बोडखे पी. एस , प्रा मिसाळ एस आर, प्राध्यापिका उके एस बी यांनी नियोजन करून यशस्वी केला . प्रास्ताविक प्रा. चहांदे किशोर यांनी केले तर सुत्रसंचलन जिनत शेख, धनश्री गर्जे, मुजाहिद शेख, यांनी केले व महाविद्यालया तर्फे आभार प्रदर्शन प्रा.डोने एल एस यांनी केले तर विद्यार्थी यांच्या वतिने आभार वनिता बांगर यांनी मानले