आरोग्यतज्ज्ञांचे मत:दुधात विषाणू नसतो मानवामध्ये संक्रमित होण्याचा धोका नाही

आष्टी (प्रतिनिधी) पाळीव जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा आजार बळावत चालल्याने गायीचे दूध प्यावे की,नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र,घरी आलेले दूध उकळून प्यायल्यास या आजाराच्या फैलावाचा कोणताही धोका संभवत नसल्याचा निर्वाळा पशुवैद्यक तज्ज्ञांनी दिला आहे.लम्पी आजाराबाबत लोकांनी बाऊ न करता सावधगिरी बाळगावी,असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.दरम्यान,या आजारामुळे नजीकच्या काळात दुधाचे उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आजारी जनावरांच्या दुधापासून धोका नाही

लम्पीग्रस्त जनावरांची धार काढताना हातमोजे,मास्क वापरणे गरजेचे आहे.अशा जनावरांचे दूध उकळून प्यायले तर अधिक चांगले.दुधाला गरम करून सेवन केले गेले तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतात.तसेच डेअरीमध्ये उच्च तापमानावर तापविले जाते.त्याच्यामध्ये विषाणू असण्याचा प्रश्नच नाही.तबेल्यातून थेट दूध घरी येत असेल तर ते मोठ्या प्रमाणात उकळून प्यावे. हा आजार जनावरांमधून मानवामध्ये संक्रमित झालेला नाही.- डॉ.मंगेश ढेरे पशुवैद्यकीय अधिकारी आष्टी

या गावात आढळले लम्पीचे जनावर 

आष्टी तालुक्यातील इमनगांव,देवळाली,फत्तेवडगांव, आष्टा (ह.ना.),कडा,डोंगरगण,जामगांव,कासेवाडी,सुरूडी,आष्टी व चिंचेवाडी या अकरा गावात लम्पीचे जनावरे आढळले असून,ते सर्व जनावरे पुन्हा रिकव्हर झाले असून,त्या परिसरातील सुमारे 9500 जनावरांना बुस्टर डोस देण्यात आले असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.