महाराष्ट्रात तब्बल दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून सुमारे दीड लाख नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता असलेल्या वेदांत - फॉक्सकोन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने राजकीय वादंग निर्माण झाल्याचा पार्श्वभूमीवर याचे पडसाद आता राज्यभरसह अमरावती जिल्ह्यात पण दिसून येत आहे.राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यात हा प्रकल्प संगनमताने जाऊ दिला आहे. सद्यस्थितीत राज्यातील उत्सवजीवी सरकारने हा बहुमूल्य व रोजगाराभिमुख प्रकल्प राज्याबाहेर जात असताना दहीहंडीच्या आयोजनातून युवकांना रोजगार-नोकरी मिळेल आशा वलग्ना केल्या आहेत.या वल्गना म्हणजे जनतेची दिशाभूल होय. जनसामान्यांची फसवणूक करणाऱ्या राज्य व केंद्र सरकारच्या ध्येय धोरण व कार्यप्रणालीचा विरोधात आज १६ सप्टेंबर शुक्रवार रोजी अमरावती शहरातील पंचवटी चौक स्थित कृषी महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने जाहीर निषेध नोंदवीत प्रतिकात्मक दहीहंडी आंदोलन करण्यात आले. या प्रतिकात्मक दहीहंडीच्या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे यांच्या नेतृत्वात यावेळी राज्य सरकारच्या बेरोजगारांच्या प्रति असलेल्या उदासीन व निष्क्रिय धोरणाचे विरोधात रोष व्यक्त करीत प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख यांनी शेतकरी, शेतमजूर, तथा बहुजनांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व प्रगतीसाठी अनेक खस्ता खात बहुमूल्य-अविसमरनिय असे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्यापासून प्रेरणा घेऊन तरी या सरकारला सुबुद्धी लाभो. अशी अभिलाषा यावेळी आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली.
केंद्र सरकारचे करायचे काय- खाली मुंडके वरती पाय, वापस दो ,वापस दो - बुरे दिन वापस दो,शिंदे-फडणवीस सरकार दहीहंडीच्या आयोजनात व्यस्त-वेदान्त प्रकल्प गुजरातला नेऊन केला फस्त,ईडी सरकारचा निषेध असो, मोदी सरकारचा निषेध असो, शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध असो, अश्या गगनभेदी घोषणा, तसेच ढोल ताश्यांच्या गजरात बेरोजगार युवकांनी प्रतिकात्मक दहीहंडी मध्ये नोंदविलेला लक्षवेधी सहभाग, घोषवाक्याचा फलक उंचावीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने व्यक्त केलेला रोष यामुळे या आंदोलकांनी यावेळी आवागमन करणाऱ्या नागरिकांसह जिल्हा प्रशासनाच लक्ष वेधले होते. तद्नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी -पवणीत कौर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने निवेदन देण्यात आले.राज्य सरकारच्या हलगर्जीपणा व केंद्र सरकारच्या दबावामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. यामुळेच महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार युवक बांधव यांच्या रोजगार प्राप्तीच्या आशेवर पाणी फेरल्या गेले आहे. आदी बाबी लक्षात घेता मोठ्या प्रकल्पाची वाट न पाहता गुजरात मध्ये गेलेला वेदान्त-फॉक्सकोन हा बहुमूल्य प्रकल्प परत महाराष्ट्र राज्यात आणण्यात यावा. अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने जिल्हाधिकारी महोदयांच्या समक्ष निवेदन सादर करताना करण्यात आली. या आंदोलनाला घेऊन पंचवटी चौक व जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस प्रशासनाचे वतीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, माजी महापौर-ऍड. किशोर शेळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष-ऋतुराज राऊत, माजी नगरसेवक-जयश्री मोरे,सपना ठाकूर, प्रवीण मेश्राम, विजय बाभुलकर, भूषण बनसोड, राष्ट्रवादी महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष-संगीता ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष-प्रा-डॉ. सुशील गावंडे, अशोक हजारे,गजानन बरडे, सुनील रायटे, दिनेश देशमुख, पप्पूसेठ खत्री, ऍड. सुनील बोळे, नितीन भेटाळू, मनीष देशमुख, मनोज केवले, जितेंद्रसिंह ठाकूर, किशोर भुयार, भोजराज काळे, दिलीप कडू, दत्तात्रय बागल, प्रमोद महल्ले, योगेश सवई, प्रशांत पेठे, बंडू निंभोकर, प्रवीण भोरे, महेश साहू, संजय मलनकर, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, निलेश शर्मा, शक्ती तिडके, चेतन वाथोडकर, अमोल देशमुख, जयकुमार नागे, अमोल वानखडे, प्रशांत यावले,सागर इंगळे, सचिन दळवी, सतीश रोंघे, प्रवीण ईचे, बाबुराव वानखडे,रवी भिवापुरे, धनराज चोवके, नितीन उर्फ छोटू खंडारकर, राजेश जवंजाळ, शैलेश अमृते, उमेश बीजवे, नितीन बुरघाटे, सागर कोकाटे, मनीष पाटील, अभिषेक धुरजड, भास्कर ढेवले, दीपक यादव, शशांक वैद्य, अजय उर्फ राणा देशमुख, बबलू अंपायर, संजीव कथीलकर, राजू तायवाडे, अविनाश बोबडे, दिलीप शिरभाते , सतीश चरपे, बाबू भैया यादव, साहिल घायर, जगदीश विश्वकर्मा, महेश यादव, जय यादव, चेतन यादव, गजानन तायडे, कपिल यादगिरे, राजाभाऊ डीवरे, प्रतीक भोकरे, प्रणव हिवसे, निकेत तांगडे, विष्णुपंत कांबे, दीपक ठाकरे, अक्षय पळसकर,निखील चर्जन,सरला इंगळे, प्रियंका शेंडे, संभाजी काळे, श्रवण लुंगे, गौरव येडेकर, सतीश देशमुख, मयुरेश चांदूरकर, सारंग देशमुख, प्रशांत कुंभारे, दिनेश मेश्राम, संजय गायकवाड, अभिषेक बोळे, राजेश बर्वे, संकेत बोके, मनीष पाटील, राजेंद्र टाके, श्रेयश दळवे,सुंदर गुप्ता, सचिन दळवी, अखिल हाते, सुनील खांडे, शुभांगी बडे,अशोक तायवाडे, डॉ. राजेंद्र दाळू, बबलू ढोरे, किशोर देशमुख, जयेश सोनोने, रोहित बाजड, गौरव उनके, सागर देशमुख, संदीप औसिकर, अतुल इटनकर, दीपक खंडारे, प्रतीक पाटेकर, राहुल हरताळकर, अभिजित चौधरी, सुरेश चौधरी, संतोष जवंजाळ, रजत धांदे, शुभम उमाळे, संजय बढे, शिवपाल ठाकुर, राजू धवणे, अनिल कदम, नितीन शेंडे, इंजिनिअर-पंकज कांडलकर,सनाउल्ला खान ठेकेदार, हबीबखा ठेकेदार, वाहिद शाह, सनाउल्ला सर, नदिममुल्ला,शेख तन्वीर, शफीउद्दीन,सबदर अली मौलाना, दिलबर शाह, शकुर बेग, फिरोज खान,हाजी मोहम्मद रफिकभाई, फिरोज शाह, जावेदभाई बॅटरी, सादिक कुरेशी,मोईन खान , छायाचित्रकार महेंद्र किल्लेकर आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व फ्रंट चे सर्व सदस्य व पदाधिकारी तसेच तारासाहेब बगीचा परिसर स्थित- जय श्रीकृष्ण मंडळ व नृसिंह दहीहंडी पथकाने सहभाग नोंदवला होता.