फुलंब्री तालुक्यात आठ दिवसांत 3 शेतकऱ्यांना घोणस अळीची बाधा शेतकऱ्यांनी शेतात काम करत असताना संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावेत शेतात जास्त प्रमाणात घोणस अळी आढळून आली तर बाह्यपर्शी कीटकनाशक फवारावे असे कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी सांगितले . तालुक्यात पिकांवर घोणस अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे . शेतात काम करताना या घोणस अळीच्या संपर्कात आल्यामुळे मागील आठ दिवसांत गिरसावळी येथील शेतकरी हिराबाई गाडेकर , रांजणगाव येथील शेतकरी राजू कोंडके व वडोदबाजार येथील पांडुरंग ब्राह्मणे या शेतकऱ्यांना बाधा झाली होती . वेळीच उपचार मिळाल्याने सध्या तिघांची प्रकृती ठीक आहे . याआधी शेतकरी लोकरी मावा , हुमणी अळी , गोगलगायींच्या संकटाचा सामना करत असताना शेतकऱ्यांसमोर आता घोणस अळीचे नवे संकट उभे राहिले आहे . वेळीच उपचार घ्यावेत शेतात काम करताना या घोणस अळीचा शेतकऱ्याच्या शरीराला जिथे संपर्क झाला तेथे विंचू चावल्याप्रमाणे त्रास होतो . नंतर मळमळ होऊन उलट्या होतात . वेळीच उपचार नाही मिळाले तर पक्षघातदेखील होऊ शकतो . यामुळे अशी लक्षणे आढळल्यास शेतकऱ्यांनी वेळीच दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत , असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी प्रसन्ना भाले यांनी केले . ही घोणस अळी विषारी असल्याने शेतकरी शेतात जाण्यासाठी धास्तावल्याचे येथील शेतकऱ्यांचे आता तब्येत ठीक आहे : ही घोणस अळी घुल्याप्रमाणेच दिसते . मी मका पिकात असताना ही घोणस अळी अंगावर पडली आणि त्रास सुरू झाला . मला लक्षणे कळाली आणि उपचार घेतले . माझी तब्येत आता ठीक आहे , असे रांजणगाव येथील शेतकरी राजू कोंडके यांनी सांगितले .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
সোণাৰি মহাবিদ্যালয়ৰ সোণালী জয়ন্তী অনুষ্ঠানত সোণাৰি কলা কেন্দ্ৰৰ শিল্পী সকলে পৰিৱেশন কৰা ঢোল বাদন
সোণাৰি মহাবিদ্যালয়ৰ সোণালী জয়ন্তী অনুষ্ঠানত সোণাৰি কলা কেন্দ্ৰৰ শিল্পী সকলে পৰিৱেশন কৰা ঢোল বাদন
এসপ্তাহে সন্ধান নাই কইনা আনিবলৈ যোৱা চিত্ৰৰঞ্জনৰ
কইনা আনিবলৈ গৈ যোৱা এসপ্তাহে সন্ধানহীন নাৰায়ণপুৰ ৰাজহচক্ৰৰ অন্তৰ্গত চৌদ্ধপুনীয়াৰ যুৱক চিত্ৰৰঞ্জন...
৭৫ সংখ্যক স্বাধীনতা দিৱসৰ অমৃত মহোৎসৱ উপলক্ষে জনসচেতনতা বৃদ্ধিৰ লক্ষ্যৰে
ৰঙিয়াতো মঙলবাৰে বিজেপি দলৰ উদ্যোগত তথা ভাতৃ সংগঠন যুৱ মৰ্চাৰ সহযোগত বাইক ৰেলী উলিওৱা হয় ।...
આદિપુરમાં જે કે લક્ષ્મી સિમેન્ટ કંપની દ્વારા નિઃશુલ્ક મેડિકલ કેમ્પ યોજાયો
ખાતે જે.કે લક્ષ્મી સિમેન્ટ તરફથી કોન્ટ્રાક્ટર તેમજ કડિયાઓ અને તેમના પરિવાર માટે નિશુલ્ક...
जोनाई महकमा में कुल 22 दुर्गा पूजा समिति ने प्रशासन से अनुमति मांगी
धेमाजी जिले के जोनाई महकमा में कुल 22 दुर्गा पूजा समितियों ने दुर्गा पूजा आयोजन करने के लिए महकमा...