औरंगाबाद (आप्पासाहेब गोरे) औरंगाबाद शहरालगत असलेल्या व अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सातारा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी समाजसेवक तथा सातारा देवलाई संघर्ष समितीचे अध्यक्ष सोमिनाथ शिराणे यांची तर व्हाईस चेअरमन पदी राजू काका नरवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी माजी सरपंच फेरोज पटेल बहाद्दर पटेल अशपाक पटेल दिलीप दांडेकर यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केले आणि सर्व धर्मीय लोकांनी मिळून ही निवडणूक पार पाडली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी के झुंजारे यांनी काम पाहिले निवडणूक पार पडताच गावात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला