हिंगोली  जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र, जिल्हा शाखा हिंगोली च्या वतीने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वराया यांची १६२ वी जयंती निमित्त अभियंता दिन हिंगोली शहरातील शिवलीला सेलीब्रेशन हॉल येथे गुरुवार दि.१५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता अभियंता दिन साजरा करण्यात आला. यावेळी सुरू वातीला भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वराया यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एन.आर.केंद्रे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली हे होते. तर उदघाटक  म्हणून मा. इंजी.सुहास धारासुरकर, राज्य अध्यक्ष अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य, तर प्रमुख पाहुणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास चे एन.आर बोंद्रे, अभियंता पाणी पुरवठा इंजि.गौरव चक्के, जिल्हा जलसंधारण अधिकारी इंजि.अशोक भंगीरे,  जि.प.हिंगोली इंजि.धनंजय जाधव, कार्यकारी अभियंता सा.बां.हिंगोली इंजि.डी.जी. पोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुमार कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, मुख लेखाधिकारी एस.एस.उबाळे, समाज कल्याण अधिकारी आर.एच.एडके आदींची प्रमुख उपस्थित  होते. 

अभियंता दिन साजरा करण्यात येणार आहे.अशी माहिती अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पतंगे, जिल्हा सचिव रा.ना. कुलकर्णी, राज्य स्तर प्रवक्त्‌या संजय सदावर्ते,कार्यध्यक्ष शिवाजी पध्दमने, सहसचिव दत्तात्रय मस्के, वसंत वीर, रंगनाथ तरडे, सल्लागार राजाराम चंदाले,  सहसचिव संजय मंठेकर, जिल्हा कोषाध्यक्ष दिलीप पाईकराव, उपाध्यक्ष प्रदिप मूळे, के.के.घुगे, बारी खान, संघटक संदेश जाधव, भास्कर लहाने, हिंगोली तालुका अध्यक्ष विश्वनाथ गव्हाने, वसमत तालुका अध्यक्ष प्रमोद उबारे, औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष रामेश्वर बोरकर, कळमनुरी तालुका अध्यक्ष दासराव गिराम होते.या कार्यक्रम सुत्र संचालन रा.ना.कुलकर्णी यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष आनंदराव पतंगे यांनी केले तर आभार इंजी.सदावर्ते यांनी मानले